पोलीस रेकॉर्डवरील आरोपीकडून पिस्टल ( बंदूक) सहीत ०४ जिवंत काडतुस जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही

6

*दिनांक ०४/१२/२०२४ रोजी पोउपनि. विनोद भुरले, पोउपनि. संतोष नींभोरकर, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर हे पोलीस स्टॉफसह मा. पोलीस अधिक्षक साहेब, चंद्रपुर यांचे आदेशा नव्ये चंद्रपुर जिल्ह्यात प्रोव्हिशन, जुगार रेड, सुगंधीत तंबाकु तसेच इतर अवैध धंद्यावर कार्यवाही करणे कामी खाना होवून पोलीस स्टेशन, पड़ोली परिसरात पेट्रोलिंग करीत अस्तांना मुखबिर व्दारे खबर मिळाली की, नामे राकेश चंद्रय्या माटला वय- २८ वर्ष, रा. तिलकनगर, अमराई वार्ड, घुग्गूस, ता. जि. चंद्रपुर हा स्वताचे ताब्यात अवैधरित्या अग्निशस्त्र व जिवंत काडतुस बाळगून मौजा घूग्गूस च्या दिशेने वाहनाने जाणार आहे. सदर माहिती वरून पोस्टे पडोली हददितील मुख्य चौकात नाकाबंदी लावून तसेच सापळा रचून आरोपीस ताब्यात घेवून त्याचेकडून एक देशी बनावटीची पिस्टल (बंदुक) सहीत ०४ जिवंत काडतुस जप्त करण्यात आले. सदर आरोपीविरुध पोस्टे पडोली येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढिल तपास स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर करित आहे.*

*सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. मुम्मका सुदर्शन साहेब चंद्रपुर, मा. अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु मॅडम, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, पोउपनि. संतोष नींभोरकर, पोहवा/ किशोर वैरागडे, पोहवा. नितेश महात्मे, पोहवा. दिपक डोंगरे, पोहवा. सतिश अवथरे, पोहवा. रजनिकांत पुठठावार, नापोशि/ संतोष येलपुलवार, पोशि/ गोपाल आतकुलवार, पोशि/ गोपीनाथ नरोटे, चापोहवा/ दिनेश अराडे, सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर येथील अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे.*
*सदर माहिती श्री महेशजी कोंडावार साहेब पोलीस निरीक्षक,स्थानिक, गुन्हे शाखा, चंद्रपुर यांनी प्रेस नोट द्वारे दिली आहे*