*श्री. माता कन्यका सेवा संस्था द्वारा संचालित, शुरवी महीला महाविद्यालय, मूल येथे भारताच्या 77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त संस्थचे उपाध्यक्ष मा.श्री. पियूष मामीडवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.*
*ध्वजारोहण कार्यक्रमानंतर मा.श्री जीवनभाऊ कोंतमवार यांच्या अध्यक्षतेखाली विविध सांस्कृतिक कार्यक्रम व विद्यार्थिनींचे मनोगत घेण्यात आले. बी. ए . व बी. एसी. मधील विद्यार्थिनीच्या सुंदर स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.*
*कार्यक्रमाचे उद्घाटक मा.श्री. पियूष मामीडवार यांनी आपल्या मनोगतात भारताच्या दीर्घकालीन इतिहासाचा आढावा घेताना स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्रवीरांच्या कार्याचा गौरव केला.*
*देशभक्तीचे स्फुल्लिंग जागवत जुलमी राजवट उलथून टाकण्यास मदत करणाऱ्या व देशभक्ती जागृत करणाऱ्या गीतांवर बी .ए.तसेच बी.एससी.विद्यार्थिनींनी समूह नृत्य सादर करून तरुण पिढीच्या मनात देशा बद्दल आदर भाव असल्याचे दाखवून दिले.*
*कार्यक्रमाचे अध्यक्ष मान. श्री जीवनभाऊ कोंतमवार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शूरवी महिला महाविद्यालय मुलींच्या भावविश्वाचा आढावा घेत शिक्षण देण्यास सक्षम आहे. तसेच आजूबाजूच्या खेड्यातील मुलींनी या संस्थेत शिक्षण घेवून भविष्यात भारताच्या प्रगतीत योगदान द्यावे असे मत व्यक्त केले.*
*सिद्धी अलोने व आरती कस्तुरे या विद्यार्थिनींनी या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले.*
*सदर कार्यक्रमाला संस्थेचे सचिव मा.श्री.राजेश सुरावार, संस्थेचे सदस्य मा.श्री. दिलीप नेरलवार, मा.श्री. दंडावार, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्या सौ. हर्षा खरासे उपस्थित होते तसेच सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थिनी व मूल शहरातील सन्मानित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.*
*ध्वजारोहनाचे सूत्रसंचालन दुर्योधन कन्नमवार यांनी केले आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मिनाक्षी राईचवार यांनी केले, प्रास्ताविक सौ. हर्षा खरासे मॅडम व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा.विक्की बोंदगुलवार यांनी मानले.*
*कार्यक्रमाला सर्व विद्यार्थिनीचा उत्स्पूर्त प्रतिसाद लाभला.*