*हिंगणघाट (शहर प्रतिनिधि)*
*”प्राणी मात्र प्रती संवेदनशीलता हा भारतीय संस्कृति चा महत्व पूर्ण भाग आहे. दया आणि करुणा केवळ मनुष्य जाती पुरते मर्यादित न राहता प्राणी व पक्षांचे बाबत सुद्धा आपण तेवढीच संवेदना ठेवली पाहिजे. मैत्रीपूर्ण व्यवहार, दया, करुणा ही भावना जोपासणे भारतीय संस्कृति ची परंपरा आहे.अध्यात्म चे दृष्टीने अनेक देव देवतांचे वाहन पक्षी आहे. पक्षाना आश्रय, भोजन, जल व संरक्षण देणे आपले कर्तव्य आहे. आज पर्यावरना चा समतोल ठेवण्याकरिता पक्षाचे अस्तित्व अत्यंत गरजेचे आहे. याच दृष्टिने पक्षाकरिता प्याऊ ची संकल्पना प्रशंसनीय आहे.असे मनोगत जिला व अतिरिक्त सत्र न्यायाधीश-1 श्री विद्याधर काकतकर यांनी स्थानीय अधिवक्ता संघाचे सभागृहात व्यक्त केले.*
*जागतिक पक्षी दिना निमित्त नारायण सेवा मित्र परिवार व अधिवक्ता संघाचे संयुक्त विद्यमाने पक्षाची तृष्णा भागविण्या करीता जल पात्र वितरण कार्यक्रमात अध्यकक्षीय भाषणा प्रसंगी ते बोलत होते.*
*कार्यक्रमाला जिला व अतिरिक्त सत्र न्यायाधीश-2 श्री राजेन्द्र मेंढे, दीवानी न्यायाधीश वरिष्ठ स्तर-1 जयदेव घुले, न्यायाधीश देशमुख, न्यायाधीश पवार, न्यायाधीश देशपांडे, न्यायाधीश बोर्डे, अधिवक्ता संघा चे अध्यक्ष एड. बोंडे, एड. मद्दलवार, एड. इब्राहिम बख्श, एड. अर्शी, एड. स्नेहल मून, एड. व नोटरी झिलटे, एड. राहत पटेल, एड. विशाल जैन,एड. गजभिये, जिला कोर्ट के अधीक्षक मनोज उदोले, नारायण सेवा मित्र परिवार के अध्यक्ष महेश अग्रवाल, पराग मुड़े, मनोज सिंघवी, चंद्रकांत रोहनकर, महेश दीक्षित, हेमंत कुलकर्णी, रूपेश लाजूरकर सहित मोठ्या संख्या में वकील व गणमान्य उपस्थित होते. प्रास्ताविक व संचालन पराग मुड़े यांनी तर उपस्थितांचे आभार महेश अग्रवाल यांनी मानले. अशी माहिती एका पत्र विज्ञप्ति द्वारे एड. इब्राहिम बख्श यांनी दिली।*