धान उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार प्रती हेक्टरी वीस हजारांचा बोनस

12

*आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला यश*

*शेतकऱ्यांनी मानले आ. मुनगंटीवार यांचे आभार*

*मुंबई – खरीप हंगाम २०२४-२५ अंतर्गत किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेत सहभागी झालेल्या नोंदणीकृत धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य शासनाने धान लागवडीखालील जमिनीच्या क्षेत्रानुसार, प्रती हेक्टरी वीस हजार रुपयांचा प्रोत्साहनपर बोनस देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला असून राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आ.श्री.सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत ही मागणी रेटून धरली होती. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश आले आहे.*

या निर्णयामुळे राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार असून, त्यांचे मनोबल वाढणार आहे. विशेष म्हणजे, शेतकऱ्यांनी धान विक्री केली असो वा नसो, तरीही ही प्रोत्साहनपर रक्कम दोन हेक्टरच्या मर्यादेत दिली जाणार आहे.

या निर्णयामागे आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि विधानसभेतील मागणी मोलाची ठरली. त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत अन्न व नागरी पुरवठा विभागाने २५ मार्च रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे.राज्यभरातील धान उत्पादक शेतकऱ्यांमध्ये या निर्णयामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. याबद्दल आ. सुधीर मुनगंटीवार यांचे शेतकऱ्यांनी आभार मानले आहेत.

*कायम शेतकऱ्यांप्रती संवेदनशील*
आ.मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची विक्रमी २०२ कोटीची रक्कम मिळू शकली होती. यापूर्वीही धानाच्या बोनससाठी पाठपुरावा करत बोनस मिळवून दिला होता. सदैव शेतकऱ्यांप्रती आ.मुनगंटीवार संवेदनशील असतात, हे विशेष.