क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूर तथा जिल्हा क्रीडा परिषद चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यामानाने आयोजित नागपूर विभागीय शालेय वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धा सन 2024-25 आज दि. 9 ऑक्टोंबर 2024 रोजी बुधवार ला जिल्हा क्रीडा संकुल चंद्रपूर येथे आयोजन करण्यात आले होते

10

या स्पर्धेमध्ये मूल च्या खेळाडूंचा सहभाग होता कर्मवीर महाविद्यालयाची विद्यार्थिनी श्रुती चंद्रकांत लोनबले 40 किलो वजन गटात नवभारत कन्या विद्यालयाची विद्यार्थिनी श्रावणी आंबूलकर 45 किलो वजन गटात तर नवभारत विद्यालयातील वैष्णवी वाढई 49 किलो वजन गटात वंशिका चिताडे 59 किलो वजन गटात असे एकूण ४ खेळाडूंनी आपापल्या वजन गटांमध्ये प्रथम क्रमांक पटकावून राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत यांची निवड झालेली आहे हे सर्व विजयी खेळाडू तालुका क्रीडा संकुल मध्ये वेटलिफ्टिंग प्रशिक्षक NIS कोच करण सुरेश कोसरे यांच्या छत्र छायेत निशुल्क प्रशिक्षण घेत आहे.
मागील वर्षीपासून तालुका क्रीडा संकुल मूल येथे करण कोसरे हे वेटलिफ्टिंग चे निशुल्क प्रशिक्षण सुरू केलेले असून मागल्या वर्षीपासून वेटलिफ्टिंग या स्पर्धेमध्ये खेळाडू घडवत आहे नुकत्याच झालेल्या गोंडवाना विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धा पार पडल्या त्यामध्ये गुणवंत खेळाडू तसेच उत्कृष्ट प्रशिक्षक यांचा सत्कार करण्यात आला यामध्ये कर्मवीर महाविद्यालय मधील अकरावी वाणिज्य शाखेत शिकत असलेली श्रुती चंद्रकांत लोणबले ही शालेय नागपूर विभागीय वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून राज्यस्तरीय स्पर्धेत निवड झाल्याबद्दल तर करण एस कोसरे मूल मधून हे प्रथम NIS केल्याबद्दल व मूलमध्ये वेटलिफ्टिंग खेळाडू घडवत असल्याबद्दल ह्या दोघांचा सत्कार करण्यात आला