मूल :- वृत्तपत्रात प्रसिदध झालेल्या बातमीच्या संदर्भात एका व्यक्तीला हाताशी धरून भ्रमणध्वनीवर कारवाई करण्याची धमकी देणा-या राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी (अजित पवार ) च्या शहर अध्यक्षा धारा मेश्राम यांच्या विरूदध पोलिस प्रशासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी मूल तालुका पत्रकार सघाने केली. याबाबत पत्रकार स्ांघाने 20 ऑक्टोबर रोजी पत्रकार भवनात तातडीची सभा बोलावून घटनेचा तीव्र निषेध केला. मागणीचे एक निवेदन मूल पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक यांना दिले. वृत्तपत्राच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न केल्यास ते कदापी खपवून घेतले जाणार नाही. असा ठराव पारित केला. दै. नवराष्ट्र 19 ऑक्टोबर रोजी धारदार शस्त्राने तरूणावर हल्ला, चौघांवर गुन्हा दाखल या मथळयाखाली वृत्त प्रकाशित झाले होते. इतर वृत्तपत्रामध्ये सुदधा बातमी प्रकाशित झाली होती.मात्र नवराष्ट्रचे पत्रकार भोजराज गोवर्धन यांना धारा मेश्राम यांनी एका अज्ञात इसमाला हाताशी धरून भ्रमणध्वनीवर फोन लाईनवर घेवून तुम्ही बातमी टाकणारे कोण होता.किती दिवसांपासून पत्रकारिता करता,समजत नाही काय, मी पोलिस विभागात अधिकारी आहे, तुमच्या वर कारवाई करतो, अशी धमकी दिली. तसेच त्यांनी वारंवार भ्रमणध्वनीवरून मानसिक त्रास देवून दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे धमकी देणा-या त्या इसमाविरूदध आणि दबाव आणणा-या धारा मेश्राम यांच्या विरूदध पोलिस प्रशासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी मूल तालुका पत्रकार संघाने निवेदनातून केली. याबाबत ठराव पारित करून घटनेचा निषेध केला. ठरावाची प्रत, निवेदन आणि वृत्तपत्रात प्रसिदध झालेली बातमी यावेळी पोलिसांना सादर करण्यात आले. तालुका पत्रकार संघाचे निवेदन पोलिस उपनिरिक्षक बोरकर यांनी स्वीकारले. यावेळी मूल तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजू गेडाम, उपाध्यक्ष युवराज चावरे,सचिव विनायक रेकलवार, संजय पडोळे, दीपक देशपांडे, अशोक येरमे, भोजराज गोवर्धन, वासूदेव आगडे, रमेश माहुरपवार, गंगाधर कुनघाडकर, रविंद्र बोकारे, गुरू गुरनूले आदी सदस्य उपस्थित होते.
Home Breaking News पत्रकार भोजराज गोवर्धन यांना बातमीच्या संदर्भात धमकी देणा-या व्यक्तीचा पत्रकार संघाने केला...