*नागरिकांनी घेतली आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांची भेट*
चंद्रपूर / श्री दीपक कटकोजवार यांच्या कडून साभार प्राप्त
गंजवार्ड वार्डातील पुरातन हनुमान मंदिराच्या जिर्नोध्दाराची मागणी घेऊन आज सकाळी 10 वाजता स्थानिक आमदार मा. किशोरभाऊ जोरगेवार यांची त्यांचे निवासस्थानातील कार्यालयात भानापेठ-गंजवार्ड- प्रभागातील जागरुक नागरिकांच्या एका शिष्टमंडळाने भेट घेवून सविस्तर चर्चा केली.याप्रसंगी छगनसिंह यादव, बबनभाऊ अन्नलवार, दिपकसिंह गवालपंची, दिलीपसिंह चंदेल, राजकुमार पाचभाई, कपील वैद्य, मनोहरराव धकाते, राजु नंदनवार, दीपक कटकोजवार यांचेसह मान्यवर नागरिकांचा भेटलेल्या शिष्टमंडळात समावेश होता. या भेटी दरम्यान आमदार श्री.जोरगेवार यांनी या कार्यात आवश्यक ती मदत करणार असल्याचे आश्वासन शिष्टमंडळास दिले.