*साहित्यातून राष्ट्रीय एकता अखंडता अबाधित ठेवणे काळाची गरज- आमदार समीर कुणावार*
*हिंगणघाट*
*स्वातंत्र्य पूर्व काळापासून प्रखर राष्ट्रभिमान जागृत करण्याचे सामर्थ्य साहित्यिकांच्या लेखणीत असल्याचा प्रसंग अनेक दा आलेला आहे. क्रांती केवळ शस्त्रानेच होत असे नाही, साहित्यिकांच्या लेखणीची धार सुद्धा कधीकधी तलवारीपेक्षा दहाक ठरते. आजच्या आधुनिक काळात लेखक असो कवी अथवा शाहीर असो त्यांच्या साहित्यातून राष्ट्रीय एकता अखंडता अबाधित राहील असा प्रयत्न होणे काळाची गरज आहे. असे प्रतिपादन मा. आमदार समीर कुणावार यांनी व्यक्त केले.*
*सदर कार्यक्रम के. जी. एन. सभागृह हिंगणघाट येथे संपन्न झाला असून सुप्रसिद्ध शायर कवी प्रा. आरिफ काजी जोश हिंगणघाट यांचे प्रथम काव्यसंग्रह “दर्पण आधा चेहरा” या हिंदी गजल पुस्तकाचे विमोचन करण्यात आले.*
*कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अरुण चौधरी होते, तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ समाजसेवी व उद्योगपति मोहनबाबू अग्रवाल, ज्येष्ठ साहित्यकार इमरान राही, नागपूरचे माजी पोलीस उप आयुक्त चंद्रकांत उदगीरकर, जमील अहमद, कार्यकारी अभियंता के. आर. बजाज, क्रीडा अधिकारी अनिल निमगडे, गजू लभाने, डॉक्टर अनिस बेग, ऍडव्होकेट इब्राहिम बख्श आजाद, शायर आरिफ काजी, किशोर उकेकर, दहापुते सर, राकेश शर्मा, विजय सत्यम, डॉक्टर विद्या कळसाईस, अमानी कुरेशी, शांतीलाल कोचर गोल्डी, प्राध्यापक प्रीती सत्यम, आदी मान्यवर सदर कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित होते.*
*शायर आरिफ काजी जोश यांच्या पुस्तक हिंदी गझल संग्रह “दर्पण आधा चेहरा” प्रकाशन बद्दल सर्व मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन व कौतुक करून पुढील वाटचाली करिता त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच अल अजीज वेलफेयर सोसायटीचे अब्दुल अमानी कुरैशी चे सौजन्याने कवि गोल्डी कोचर, आरीफ काजी, मजीद बेग मुगल, मुरली लाहोटी, अब्दुल कदीर बख्श, मुस्तफा बख्श यांचा सत्कार ही करण्यात आला.*
*कार्यक्रमाचे संचालन सुप्रसिद्ध वकील इब्राहिम बख्श आजाद, प्रास्ताविक कदीर बख्श व आभार प्रदर्शन मुस्तफा बख्श यांनी केले कार्यक्रमाला असंख्य पुरुष व महिला, साहित्यिक, क्रीडा प्रेमी, कवी मोठ्या संख्येने उपस्थित होते.*