- *( डी. डी. देवगडे यांच्या कडून साभार प्राप्त )*
*जुनी पेन्शन योजनेचे समर्थन करत असतांना कर्मचारी बंधू-भगिनींना हे आवाहन आहे की कर्मचारी भरती करावी म्हणून सरकारला मागणी करणे, कंत्राटी कामगारांना किमान 30000 वेतन द्यावे तसेच असंघटित कामगारांना योग्य वेतन द्यावे या मागणीसाठी सुद्धा पाठिंबा द्यावा. तसेच शेतकऱ्याचा माल विकत घेतांना बार्गेनिंग करू नये. आपल्या घरी काम करणाऱ्या मोलकरणीला योग्य वेतन देण्याचे धाडस सुद्धा दाखवावे. त्यांच्या पी एफ आणि इतर गोष्टींना उत्तरदायी असण्याचे धारिष्ट्य दाखवल्यासच आपली मागणी योग्य आहे असे समाजमन तयार होईल. सरकारी कर्मचारी (मुख्यतः तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी सामान्य घरातीलच आहेत. त्यामुळे सामान्य लोकांप्रति त्यांनी बांधिलकी दाखवल्यासच सर्वसामान्य लोकांची सहानुभूती आपणाप्रति निर्माण होईल.)* *सुनिल बौद्ध*