*गुन्हा दाखल होताच उपसरपंच अशोक मार्गनवार पसार , मूल तालुक्यात अशोक मार्गनवार च्या महिले वर हात उचलून मारहाण करण्याच्या या कृत्याचा सर्व क्षेत्रात निषेध व्यक्त केल्या जात आहे*
*मूल : तालुक्यातील चांदापूर ग्राम पंचायतच्या सरपंचा सोनूताई कालिदास देशमुख यांना मारहाण केल्याप्रकरणी चांदापूर ग्रामपंचायतचे उपसरपंच अशोक मार्कंडी मार्गनवार यांचे विरूध्द मूल पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान अटकेच्या भितीने उपसरपंच पसार झाले असुन तालुक्याच्या राजकीय क्षेत्रात सदर घटनेविषयी चर्चा रंगु लागली आहे.*😢
*चांदापुर येथील सरपंच सोनुताई देशमुख यांनी नोंदवीलेल्या तक्रारीनुसार दिनांक २३ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता ग्रामपंचायत ची मासिक सभा होती. मासीक सभेला ७ सदस्य उपस्थित होते. विषय क्रमांक ८ नुसार विद्युत साहित्य दर पत्र चालु असतांना उपसरपंच अशोक मार्गनवार यांनी कारण नसताना इतर मुद्दे सभेत उपस्थित करून आपल्याशी शाब्दीक वाद केला. सरपंच म्हणुन मी मासीक सभेच्या अध्यक्ष स्थानी असतांना उपसरपंच मार्गनवार ह्यांनी विनाकारण वाद उकरून काढुन सभेतच माझे हात पकडले व उजव्या हाताची बाजू पकडून गालावर थापड मारली. त्यामुळे बांगडीचे काच माझ्या हाताला रूतल्याने दुखापत झाली. उपसरपंच अशोक मार्गनवार येवढ्यावरच थांबला नाही तर त्यांनी अश्लील शब्दात शिवीगाळ करत मला मारण्याची धमकी दिली. सरपंच देशमुख यांच्या लेखी तक्रारीवरून मूल पोलिसांनी उपसरपंच अशोक मार्गनवार विरूध्द भादविचे कलम ३५४, ३५४ A(१)(i), ५०९, २९४, ३२३, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार सतिशसिंह राजपुत यांचे मार्गदर्शनात सुरू आहे. पोलीसांनी गुन्हा दाखल करताच उपसरपंच अशोक मार्गनवार अटकेच्या भितीने पसार झाले आहे. महिला सरपंचास मारहाण झाल्याच्या घटनेचा तालुका सरपंच संघटनेने निषेध नोंदविला असुन प्रकरणाचा तपास करून योग्य कारवाई करावी. अशी मागणी केली आहे.*